न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४) :- वाल्हेकरवाडी परिसरातून गतवेळी मताधिक्य देणाऱ्या नागरिकांची साधी पोस्ट कार्यालयाची मागणी खासदारांनी पूर्ण केली नसल्याची माहिती नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी दिली आहे.
वाल्हेकरवाडी, रावेत, चिंचवड परिसरातून श्रीरंग बारणे यांना गतवेळी नागरिकांनी मोठे मताधिक्य दिले होते. रावेत वाल्हेकरवाडी परिसरात सध्या साठ हजारांहून अधिक लोकसंख्या आहे.
येथील नागरिकांनी केवळ पोस्ट कार्यालयाची मागणी केली होती. ही मागणी गेल्या पाच वर्षांत देखील खासदार श्रीरंग बारणे हे पूर्ण करू शकले नाहीत. तसेच या परिसरात खासदार म्हणून एकही विकासकाम न केल्याचा दावाही मोरेश्वर भोंडवे यांनी केला आहे.










