- १०० रुपयांत मिळेल रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२३) :- शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठीच्या ८२७ कोटी ३५ लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हा शिधा वितरित केला जाईल, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना शिधा मिळेल.
रवा, चणाडाळ, साखर (प्रत्येकी एक किलो) आणि एक लिटर खाद्यतेल १९ सप्टेंबर रोजी गौरी-गणपती उत्सवानिमित्त व १२ नोव्हेंबर- पासून सुरु होणाऱ्या दिवाळी- निमित्त वितरित करण्यात येईल.