- औद्योगिक क्षेत्रातील अधिकृत व अनधिकृत उद्योगांची माहिती मुदतीत द्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२३) :- पवना, इंद्रायणी व मुळा नदी नजिकच्या औद्योगिक कंपन्या व उद्योगामुळे जलप्रदूषण होते. ते प्रदूषण रोखण्यासाठी विविध विभागांच्या अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक महापालिकेतील आयुक्त दालनात नुकतीच झाली.
बैठकीस महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. (एमपीसीबी), महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए)चे अधिकारी तसेच, लघुउद्योजक व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
औद्योगिक क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची माहिती एमआयडीसीने जमा केली आहे. शहरातील औद्योगिक क्षेत्रातील अधिकृत व अनधिकृत उद्योगांची माहिती जमा केली जात आहे. त्या संदर्भातील अहवाल चिंचवड येथील एमआयडीसीच्या कार्यालयात ३० ऑगस्टपर्यंत जमा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सिंह विविध विभागांच्या अधिकारी व प्रतिनिधींना केले. या संदर्भातील माहिती न देणाऱ्या कारखाने व उद्योगांवर पर्यावरण संवर्धन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला
पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाचा डीपीआरचे सादरीकरण केले. त्याच धर्तीवर पवना धरणापासून ते दापोडीपर्यंतच्या पवनानदी सुधार प्रकल्पाचा अहवाल तयार केला जात असल्याचे सांगण्यात आले.