- पत्नी गंभीर जखमी, पती गजाआड; चिंचवडमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२३) :- घरगुती भांडणाच्या कारणावरुन आरोपी पतीने पत्नीला घरात झोपेत असतानाच तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन गंभीर जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २०) रोजी पहाटे ०५.३० च्या सुमारास गगनगिरी मठाजवळ, चिंचवडमध्ये घडली. जखमी महिलेच्या बहिणीने आरोपी गणेश मोहन झोंबाडे (वय ४२ वर्षे रा. गावडे चाळ, चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलीसांनी ५१५/२०२३ भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक केली आहे. पोनि कदम तपास करीत आहेत.















