न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२३) :- नाष्टा करण्यासाठी फिर्यादी हे मॅनेजर आणि त्यांच्या मित्रांबरोबर हॉटेलमध्ये गेले होते. त्यांच्या बरोबर असणारे मॅनेजर हे हॉटेलमधील टायलेटमध्ये फ्रेश होण्यासाठी गेले होते. त्यावेळी टायलेटमध्ये हॉटेलमधील वेटरने त्याचा मोबाईल पेपरवर ठेवुन टायलेटमध्ये जाणा-या व्यक्तीच्या खाजगी जागेचे उद्ददेशपुर्वक व्हिडीओ चित्रीकरण केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २०) रोजी दुपारी ४३० च्या दरम्यान आकुर्डीतील हॉटेलमध्ये घडला. याप्रकरणी २८ वर्षीय इसमाने आरोपी ईरण्णा शिवण्णा पांढरे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी ५१७/२०२३ माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (इ) नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोनि कदम पुढील तपास करीत आहेत.















