न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४) :- वोक्सवॅगन कंपनीचे सीएसआर हेड पंकज गुप्ता यांनी गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे वाहनांच्या चाव्या सुपूर्द केल्या.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये वाहनांचा तुटवडा जाणवत होता. तसेच लोकसभा निवडणूक असल्यामुळे वाहनांच्या तुटवड्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम जाणवत होता.
त्यामुळे आयुक्तांनी चाकणमधील कंपन्यांना सीएसआर फंडातून वाहने देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार वोक्सवॅगन कंपनीने पाच वाहने दिले असून, शुक्रवारी (दि. ५) रोजी बोलेरो कंपनीच्या पाच जीप आयुक्तालयाला देण्यात येणार आहेत.
यावेळी कंपनीचे अकाउंट हेड कौशिक बासू, बियु भंडारी शोरूम हेड बाळासाहेब सहाणे, डिलरशिपचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश भंडारी, सरव्यवस्थापक वैजंती शेवाडे, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांच्यासह आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.










