- पिंपरी व आकुर्डीतील आवास योजनेसाठी नागरिकांची झुंबड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२३) :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी व आकुर्डी येथील प्रकल्पांसाठी सुमारे दहा हजार १०८ लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांकडून (दि. २८ जून) पासून अर्ज मागविण्यास महानगरपालिकेने प्रारंभ केला होता. त्याची अंतिम अर्ज सादर करण्याची मुदत (दि. २७ ऑगस्ट) पर्यंत होती. या मुदतीमध्ये हे अर्ज प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले
या प्रकल्प अंतर्गत आकुर्डी येथे ५६८ तर पिंपरी येथे ३७० सदनिका उभारण्यात आल्या आहेत. पिंपरी येथील ३७० सदनिकांसाठी ४६३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. आकुर्डी येथील ५६८ सदनिकांसाठी ६६९३ लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.












