न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या हेतूने स्वीप व मतदान जनजागृती कक्षातर्फे २०५, चिंचवड विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणा-या विविध शाळांमध्ये स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.
त्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून नागरिकांनी मतदान करणेबाबत विविध विषयांवर निबंध स्पर्धा व पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे मतदार संघातील दिव्यांग / अपंग नागरिकांना घरोघरी भेट देवून, दिव्यांग मतदारांना मतदानासाठी उपलब्ध सुविधांबाबत माहिती देण्यात आली व ज्या दिव्यांग नागरिकांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही, त्यांचेकडून संबंधित सेक्टर ऑफिसर यांचेमार्फत फॉर्म नं.६ भरुन घेणेत आले.
सदर मतदान जनजागृतीसाठी २०५, चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. मनिषा कुंभार यांनी मार्गदर्शन केले व श्रीम. बारटक्के / हवाळ तहसिलदार तसेच संबंधित सेक्टर अधिकारी यांचे योगदान लाभले, असे २०५,चिंचवड विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा नोडल अधिकारी (SVEEP) डॉ. प्रविण आष्टीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.










