न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल) :- छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारले, त्यांच्या पार्थिवाचे तुकडे करून वढू, तुळापूर (जि. पुणे) येथे टाकले. आज त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
वढू बुद्रुक येथे महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेही समाधी उभारण्यात आली आहे. स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र तुळापूर येथे जाऊन महाराजांच्या समाधी स्थळास भेट दिली.
छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला व राजेंच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश यादव, किशोर लोंढे, दिपक घन आदी उपस्थित होते










