न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल) :- छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त आज शुक्रवार (दि. ५) रोजी शाहूनगरमधील बर्ड व्हली येथे संभाजी महाराजांच्या शिल्पास छावा युवा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अभय सोपानराव भोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सतीश भांडेकर, अजय भोसले, गिरीश साबळे, संभाजी बारणे, सिद्धार्थ चपळगावकर, करण शिंदे, अक्षय शिंदे, महेंद्र कांबळे, कुनाला, गणेश विपट, मुझफ्फर इनामदार, मारुती बानेवर, दुर्गा भोर, किरण हिंगोले व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी वडार समाज दाम्पत्य शिल्प प्रतिकृतीसही हार अर्पण करण्यात आला.
अभय भोर यांनी संभाजी महाराजांविषयीचे विचार तरुणांना सांगितले व येणाऱ्या नव्या पिढीने महाराजांचा आदर्श समोर ठेऊन वागावे, असे आवाहन केले. तसेच शाहू नगरमधील संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कुठलीही सुविधा नाही. त्या ठिकाणी महानगरपालिकेने कायमस्वरूपी जीना करावा. त्यामुळे शिल्पास हार अर्पण करताना सोयीचे होईल. शिडी लावल्यामुळे शिल्पास इजा होण्याची संभावना जास्त आहे. तरी महानगरपालिकेने येथे उभारण्याची मागणीही यावेळी भोर यांनी केली आहे.










