न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२३) :- घरी असताना फिर्यादीला अनोळखी इसमाने त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअँप मॅसेज केला. त्यांचा विश्वास संपादन करुन टेलिग्राम अॅपवर टास्कच्या माध्यमातून पैसे गुंतवणुक करण्यास भाग पाडले. फिर्यादीकडुन ३४,०७,००० इतके रुपये घेवुन ते आरोपीने त्याच्या आर्थिक फायदयासाठी वापरले. घेतलेले पैसे परत न देता सदर रकमेचा अपहार करुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फसवणुकीचा हा प्रकार (दि २३/०८/२०२३) रोजी सायकाळी ६/०० वा ते (दि.३०/०८/२०२३० रोजी घडला. महीला फिर्यादी यांनी आरोपी अनोळखी इसम (मो.न. धारक ९११९७३७३३४ व ७२०६३३७४६१) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी १०३५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मपोउपनि बोरकर पुढील तपास करीत आहेत.






![[हिंजवडी] टास्कच्या माध्यमातून महिलेने गमावले चौतीस लाख रुपये...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-3-90x60.jpeg)
![[हिंजवडी] टास्कच्या माध्यमातून महिलेने गमावले चौतीस लाख रुपये...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/68c55561-2b79-4cb5-a8a1-051e6d8045f5-90x60.jpeg)



