- महापालिका आयुक्त झाले संचालक मंडळाचे पहिले चेअरमन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी येथे दिव्यांगांसाठी चार मजली इमारतीचे दिव्यांग भवनाचे बांधकाम पुर्ण झाले असून, लवकरच दिव्यांग भवन कार्यान्वित होणार आहे. दिव्यांग भवनाची Section 8 अंतर्गत कंपनी स्थापन करन्यात आलेली असून आज (दि.०१) रोजी आयुक्त यांच्या दालनामध्ये दिव्यांग भवन संचालक मंडळाची पहिली सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेस शेखर सिंह, चेअरमन तथा आयुक्त, प्रदिप जांभळे पाटील संचालक तथा अतिरिक्त आयुक्त (१), अजय चारठाणकर, संचालक तथा उप आयुक्त समाज विकास विभाग, श्रीनिवास दांगट, संचालक तथा सहाय्यक आयुक्त, (दिव्यांग कक्ष), समाज विकास विभाग, गिरीष परळीकर, दिव्यांग भवन फाऊंडेशन कंपनी सेक्रटरी उपस्थित होते.
सभेत आयुक्तांची संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करणेत येऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा पार पडली. सदर सभेत (मेमोरँडम ऑफ असोसिएशन) आणि संस्थांतर्गत कामकाजाची नियमावली (आर्टिकल्स ऑफ असोसिएशन) यांचा आढावा घेऊन त्यास मान्यता देणेत आली. तसेच कंपनीच्या रोजच्या कामकाजासाठी एक पूर्ण वेळ कार्यकारी संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) नेमणे विषयी चर्चा करून निर्णय घेणेत आला व तात्काळ नेमणुकीची कार्यवाही करणेबाबत चेअरमन यांनी सुचना दिल्या. कंपनीच्या रोजच्या कामकाजासाठी लागणा-या मनुष्यबळाविषयी चर्चा करून निर्णय घेणेत आला. कंपनीला आवश्यक असणा-या विविध सल्लागारांच्या नेमणुकीविषयी चर्चा करून निर्णय घेणेत आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा प्रकल्प संपूर्ण देशभरातला पथदर्शी प्रकल्प होईल या दृष्टीने पावले उचलण्या साठीचे निर्णय घेणेत आला. कंपनीस तिच्या कार्यकाळातील पहिल्या दोन वर्षांसाठी सहाय्य करण्यासाठीचा ठराव करणेत आला. अशा प्रकारे कंपनीच्या कामकाजाचा सर्वांगीन आढावा घेऊन आवश्यक ते ठराव करणेत आले. तद्नंतर संचालक मंडळाची बैठक संपन्न होऊन पुढ़ील बैठक माहे ऑक्टोबर २०२३ मध्ये घेणेबाबतचा निर्णय घेऊन सचिव यांनी सर्वांचे आभार मानले.












