- अचानक आलेल्या पावसामुळे विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे हाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहुगाव वार्ताहर (दि. 02 सप्टेंबर 2023) :- देहुगावात ढगांच्या गडगडाटात आज शनिवारी सकाळी सहाच्या दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी आणि कामाला जाणाऱ्या नागरिकांना पावसामुळे भिजत जावे लागत आहे.
पावसाने काही दिवस अचानक दडी मारल्याने पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यात उन्हाच्या झळा पसरल्या होत्या.
शनिवारी सकाळी अचानक आलेल्या पावसाने देहु, सुदुंबरे आणि आजुबाजुच्या परिसरात धुवाधार सुरूवात केली. रस्ते ओलेचिंब झाले आहेत. इंद्रायणीत पाण्याची आवक सुरू झाली आहे.
चाकरमान्यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली आहे. अजुनही देहू आणि लगतच्या परिसरात पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे.















