न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- मेट्रोच्या कामासाठी लागणाऱ्या पाच हजार रुपये किंमतीच्या १० लोखंडी सेंटरींग प्लेटा रिक्षातील आरोपी क्रं. १ ते ३ यांनी चोरुन नेल्या. हा प्रकार (दि. ३) रोजी सकाळी ६.३० वाजता वाकड ब्रिजजवळ, हिंजवडी येथे घडला.
फिर्यादी संकेत सुखदेव राऊत यांनी आरोपी १) प्रथमेश पमेश सोनवणे (वय २२ वर्षे धंदा-रिक्षा चालक रा. खिंवसरा शाळेजवळ गणेशनगर थेरगाव), २) धर्मा बुवाजी भोसले (वय ३१ वर्षे धंदा-मजुरी रा.सदानंद हॉटेलचे पाठीमागे लेबर कॅम्प बाणेर), ३) महीप्या लक्ष्मण पाटेकर (काळेवाडी फाटा, थेरगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली.
हिंजवडी पोलिसांनी १०४३/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींना गजाआड केले आहे. पोना बाबर तपास करीत आहेत.









![[हिंजवडी]:- मेट्रोचे पाच हजारांचे साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना जेलची हवा...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-10-90x60.jpeg)
![[हिंजवडी]:- मेट्रोचे पाच हजारांचे साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना जेलची हवा...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-2-2-90x60.jpeg)




