न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने यांची पुणे रक्षा संपदा अधिकारी कार्यालयात (डीईओ पुणे) बदली झाली आहे.
याबाबत माने यांनीच दुजोरा दिला आहे. दरम्यान माने यांच्या जागेवर नवीन सीईओ कोण पदभार स्वीकारणार याबाबत अजून लष्कराच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कुठलेही आदेश नाहीत.
कॅन्टोन्मेंट सीईओचा कार्यकाळ साधारण दोन ते अडीच वर्षांचा असतो. माने गेल्या १५ महिन्यांपासून देहूरोड कॅन्टोन्मेंटचे सीईओ म्हणून कार्यरत होते.


















