न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- रक्षाबंधनाचे औचित्य साधून चिंचवड शहरातील पीएमपीएलच्या बसमध्ये वाढ करण्यात आली होती. दि. ३० व ३१ या दोन दिवसांमध्ये चार कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. सणाच्या निमित्ताने गर्दी असल्याने नियमित बसेसपेक्षा जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.
पिंपरी चिंचवड शहरात १,८३७ बसेस नियमित धावतात. त्यात निगडी, भोसरी, पिंपरी या तीन स्थानकांतून फेऱ्या सुरू असतात. परंतु, याव्यतिरिक्त ९६ जादा बसेस वाढविण्यात आल्या होत्या. यावर्षी महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रवास केला, असे समोर आले आहे. रक्षाबंधनामुळे उत्पन्न वाढले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जादा प्रतिसाद मिळाला आहे. भोसरी आगारातून दोन दिवसांत २९ लाखांचे उत्पादन मिळाले आहे. ४२८ बसेस धावल्या, ३८ जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. १ लाख ६७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीचा फायदा झाला.


















