- जबाबदार वाहन चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- एकाच दिवशी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील म्हाळुंगे आणि पुनावळे येथे घडलेल्या अपघातात दोघा दुचाकीस्वरांचा हकनाक बळी गेला आहे. आरोपी वाहन चालकांच्या विरोधात म्हाळुंगे आणि रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत म्हाळुंगे येथुन फिर्यादीचा मित्र त्यांना घेण्यासाठी भारत पेट्रोल पंप, वाघजाईनगर येथे त्याच्या दुचाकी (एमएच१४सीएफ ४०९७) वर जात होता. दरम्यान वाटेत त्यांना अज्ञात वाहनाने भरधाव वेगात वाहन चालवुन धडक दिली. फिर्यादीचा २७ वर्षीय मित्र (सध्या रा. शिरोली ता.खेड जि.पुणे; मुळ रा. काचन, पो. किरबील. ता . मयरपुर जि दुधी सनोहद्रा राज्य उत्तर प्रदेश) याचा अपघात केला. त्याला उपचारास न नेता तसेच पोलीसात खबर न देता आरोपी वाहनचालक घटना स्थळावरून निघुन गेला. फिर्यादी यांच्या मित्राच्या मृत्युस कारणीभुत झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा अपघात (दि. ७) रोजी रात्री ००.०५ ते ०१.०० च्या सुमारास म्हाळुंगे, चाकण-तळेगाव रोड, बजाज कंपनीजवळ घडला. फिर्यादी संतोष विठ्ठल सांगळे यांनी आरोपी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५४७ / २०२३ भा.द.वि.स.क. ३०४ ( २ ), २७९ मो वा कलम १८४, १३४ (अ), (ब) नुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोउपनि शिंदे पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत पाण्याचा टाटा आयशर कंपनीचा टँकर (एमएच०५के९१३७) हा भरधाव वेगात रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन आरोपीने हयगयीने चालवला. होंडा कंपनीच्या अॅक्टीव्हा मोपेड (एमएच१४एचव्हि२११६) हीला धडक दिली. अपघातात अॅक्टीव्हा मोपेडस्वाराचा मृत्यू झाला. आरोपी त्याच्या मृत्यूस कारणीभुत झाला आहे.
शाबाज मोहम्मद मेहबुब (वय २० वर्षे, सध्या रा. दर्शन नगरी, चिंचवड, पुणे, मुळ कर्नाटक) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे आव आहे. हा अपघात (दि. ७) रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास कळमजाई मंदीराकडुन कोयतेवस्तीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर, पुनावळे अंडरपास ब्रिज, पुनावळे येथे घडला. फिर्यादी मोहम्मद जिशान मोहम्मद मनोवर शेख यांनी आरोपी नानासाहेब चंद्रकांत फुलारी (वय ३५ वर्षे, रा. कोयते वस्ती, पुनावळे) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. रावेत पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात ३३० / २०२३ भा.दं.वि.स. कलम २७९, ३०४ (अ) सह मो. वा. का. कलम १८४ प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मपोउपनि तोडकर पुढील तपास करीत आहेत.