- पोलिसांना पाहून आरोपीने ठोकली धूम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- खेड तालुक्यातील चाकण येथील गोनवडी गावाजवळ (दि. ७) रोजी सकाळी ८.०० च्या सुमारास एकाच्या शेताजवळ ओढ्याच्या कडेला आरोपीने हातभट्टी दारुची भट्टी लावली.
त्यासाठी आरोपीने बेकायदा गावठी हातभट्टीसाठी लागणारे अंदाजे ७०,००० रुपयांचे कच्चे रसायन व २,००० रुपये किंमतीची तयार दारु जवळ बाळगली. गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस आल्याची चाहुल लागताच तब्बल ७२००० रुपये किमतीचा प्रोव्हीजनल माल तिथेच टाकून आरोपी पळुन गेला आहे.
जीवन मारुती रजपुत (रा. गोनवडी ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात ७१२/२०२३ महाराष्ट्र दारूबंदी अधि कलम ६५ (फ) (इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मपोना टाव्हरे पुढील तपास करीत आहेत.









![[चाकण]:- दारुची भट्टी पेटवण्याआधीच पोलीस घटनास्थळी हजर..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-8-90x60.jpeg)
![[चाकण]:- दारुची भट्टी पेटवण्याआधीच पोलीस घटनास्थळी हजर..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-4-3-90x60.jpeg)




