न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- ग्लोबल इंडिया कंपनीकडून ट्रेडींगमध्ये पैसे गुंतविण्याकरिता आरोपीने फिर्यादीला टास्क पुर्ण करण्याचे शिक्षण दिले. त्यानंतर फिर्यादी यांना टास्कचे पैसे मिळत गेले. त्यानंतर मोबाईल द्वारे क्रिप्टो चलनाकरिता अधिक माहिती देत त्यांचा टेलीग्राम ग्रुप तयार केला.
फिर्यादी यांनी त्यात अंदाजे ३३ लाखांची गुंतवणुक केली. त्याचा परतावा ६० लाख येणे आहे; परंतु तक्रारदार यांनी टॅक्स ड्युटी भरली नाही तर, परतावा मिळणार नाही, असे फिर्यादीला सांगितले. तक्रारदार यांनी ते देण्याचे कारण विचारले असता, फिर्यादीच्या लक्षात आले की त्यांची फसवणुक झाली आहे. फिर्यादीची एकुण ३३,०२,४४० रुपयांची आरोपींनी आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि २६/०८/२०२३ ते दि २७/०८/२०२३ रोजी पर्यंत) पिंपळे सौदागर येथे घडला. फिर्यादी अंजुल कुमार वेदप्रकाश वर्मा यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी ४७७/२०२३ भा.द.वि. ४२०, माहीती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (डी) अन्वये आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वपोनि पौळ पुढील तपास करीत आहेत.










![[पिंपळे सौदागर]:- ग्लोबल इंडियाच्या नावे गुंतवणुकीतून एकाची लाखोंची आर्थिक फसवणूक...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/Shirur-police-raids-90x60.jpg)
![[पिंपळे सौदागर]:- ग्लोबल इंडियाच्या नावे गुंतवणुकीतून एकाची लाखोंची आर्थिक फसवणूक...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-5-3-90x60.jpeg)



