न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२३) :- हिंजवडी येथील मार्केटयार्ड येथून एअरटीका गाडी (एमएच१४जे.एक्स६४६७) मधुन फिर्यादी हे भाजीपाला घेवून येत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला होंडाई कार (एमएच१४जेएक्स००९३) ही घासुन पुढे गेली व थांबली. गाडीच्या घासाघासीच्या कारणावरुन होंडाई गाडीतील आरोपी क्र १ व २ यांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली.
आरोपींनी त्यांच्या मित्रांना बोलावून त्यापैकी आरोपी क्र ३ याने फिर्यादिच्या पाठीवर व डोक्यावर दगडाने मारुन त्यांना जखमी केले आणि आरोपी निघून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. ८) रोजी रात्री ९.२० च्या सुमारास जांभुळकर जिम जवळ, साखरे वस्ती रोड, हिंजवडी येथे घडली.
फिर्यादी पप्पु कुमार सहदेव प्रसाद गुप्ता यांनी आरोपी १) विकास प्रकाश साखरे (वय २५ वर्षे रा. साखरेवस्ती हिंजवडी), २) आदित्य कैलास मातेरे (वय २१ वर्षे रा. साखरेवस्ती हिंजवडी), ३) रितेश (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही रा. साखरे वस्ती), ४) लाल जांभुळकर (रा. साखरे वस्ती), ५) तीन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध १०५६/२०२३ भा.द.वि. कलम ३२३,३२४, ४२७, १४३, १४७, १४८, १४९ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि काकडे पुढील तपास करीत आहेत.









![[हिंजवडी]:- गाडीच्या घासाघासीच्या कारणावरून त्या तरुणांची दादागिरी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-3-2-90x60.jpeg)
![[हिंजवडी]:- गाडीच्या घासाघासीच्या कारणावरून त्या तरुणांची दादागिरी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/8a1af552-5ac5-4b8f-bb95-0d66cd213d3f-90x60.jpeg)




