- मा. नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२३) :- माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरवाडी दत्तनगर, विद्यानगर परिसरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ४८० नागरिकांनी सहभाग नोंदवला.
या आरोग्य शिबिरामध्ये स्तनरोग चाचणी, कर्करोग चाचणी सोनोग्राफी, एक्स-रे, मधुमेह रक्त तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करून जागेवर रिपोर्ट देण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, राजू दुर्गे, तुषार हिंगे, विशाल काळभोर, गजानन लोकसेवा बँकेचे अध्यक्ष योगेश बाबर, दिलीप दातीर पाटील, गणेश लंगोटे, अण्णा लुकर यांच्या उपस्थितीत पार पडले.
त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी उद्योजकता शिबिराचे आयोजन शाहूनगर करण्यात आले होते. ३० महिला बचत गटांनी प्रतिसाद नोंदवला. तसेच सायंकाळी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह पार पडला. त्यामध्ये प्रभागातील ३५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. भाजपा पिंपरी चिंचवड प्रभारी वर्षा डहाळे तसेच पुणे विद्यापीठाचे सदस्य राहुल पाखरे व तुषार हिंगे, विजय वरुडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पिंपरी विधानसभा भाजपा प्रमुख अमित गोरखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.















