- वाहनं नावावर करून न देता आर्थिक फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२३) :- काम करणाऱ्या कंपनीसाठी फिर्यादीला एक अॅम्ब्युलन्स वाहनाची आवश्यकता होती. ते वाहन इंटरनेटच्या माध्यमातुन शोधात होते. त्यानंतर आरोपीकडे अॅम्ब्युलन्स वाहन उपलब्ध असल्याने फिर्यादी त्यांच्या संपर्कात आले. आरोपी हा फिर्यादीच्या कंपनीमध्ये अॅम्ब्युलन्स वाहन मारुती ओमीनी (एमएच०१/एस.ए. ४१७३) ही घेवुन आला होता. त्यावेळी फिर्यादीने प्रत्यक्ष आरोपी व त्याच्या ताब्यातील त्याच्या मालकीच्या अॅम्ब्युलन्स वाहनाची पाहणी केली. ते जुन्या स्वरुपात असल्याने वाहनाची खरेदी किंमत ही रक्कम दोन लाख विस हजार रुपये इतकी ठरली. त्याप्रमाणे फिर्यादीने सदरचे वाहन आरोपीकडून विकत घेतले. आरोपीला रक्कम रुपये २,००,००० हे आरटीजीएस कंपनीच्या खात्यावरुन देण्यात आले. उर्वरीत रक्कम २०,०००/- रुपये हे सदरचे वाहन कंपनीच्या नावे करुन दिल्यानंतर आरोपी याला देण्याचे ठरले होते.
तत्पुर्वी सदरचे वाहन हे नावे करुन देण्याची आरोपीने जबाबदारी स्विकारलेली होती. त्या बदल्यात त्याने विश्वासाने फिर्यादीकडुन रक्कम स्विकारलेली होती. त्यावेळी त्याने फिर्यादीला वाहनाचे आरसी बुक दिले नव्हते, व सदरचे वाहन हे स्वत:चे असल्याची फिर्यादीला खात्री दिली होती. तदनंतर आज पावेतो फिर्यादीने आरोपी यांना वेळोवेळी संपर्क साधुन तसेच समक्ष भेट घेवुन सदरचे वाहन कंपनीच्या नावे करुन देण्याबाबत विनंती केली. परंतु त्याने आज पावेतो टाळाटाळ केली.
वाहनाबाबत फिर्यादीने अधिक खात्री केली तेव्हा सदरचे अॅम्ब्युलन्स वाहन हे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, रेल्वे मुंबई कार्यालय, माझगाव, मुंबई यांच्या नावे रजिस्टर्ड असल्याचे फिर्यादीला समजले. तसेच ते स्क्रॅपमध्ये विक्री केल्याचे समजते. त्यावरुन आरोपीने फिर्यादी व त्यांच्या कंपनी प्रशासनाचा विश्वास संपादन करुन त्याने स्क्रॅपमध्ये विकत घेतलेले अॅम्ब्युलन्स वाहन (मारुती ओमीनी) विक्री करुन सदरचे वाहन कंपनीच्या नावे नोंदणीकृत करुन न देता टाळाटाळ करुन फिर्यादीची फसवुणक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. २५/०२/२०२२ ते आज पावेतो) मौजे निघोजे येथिल इंम्पेरीअल अॅटो इंडस्ट्रीज लिमीटेड, ता.खेड जि.पुणे येथे घडली.
फिर्यादी रवि राघवेंद्र धुतेकर यांनी आरोपी झाकीर खान (रा. जिल्हा परीषद कॉटर, खडकेश्वर, घाटी गेट, छञपती संभाजीनगर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ५५२/२०२३ भा.द.वि.क. ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोहवा गाडीलकर पुढील तपास करीत आहेत.








![[निघोजे]:- भंगारात विकत घेतलेल्या अॅम्ब्युलन्सची चक्क सव्वादोन लाखांना कंपनीला विक्री..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-10-90x60.jpeg)
![[निघोजे]:- भंगारात विकत घेतलेल्या अॅम्ब्युलन्सची चक्क सव्वादोन लाखांना कंपनीला विक्री..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-16-90x60.jpeg)



