- क्रेनला लावलेला जॉब डोक्याला लागुन कामगाराचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- खेड तालुक्यातील कुरुळीच्या स्पाकॉर्न इंजिनिअर्स कंपनीत फिर्यादी हे नेहमीप्रमाणे कामावर आले. त्यावेळी आरोपी हा त्याच्या ताब्यातील क्रेन (एमएच१४केजे५८६९) यावर चालक म्हणुन कामास आलेला होता. तसेच रिगर सुमित रामभवन मौर्य व त्याच्या बरोबरचे इतर कामगार मोठे जॉब क्रेनला अडकविण्याच्या लोंडींग अनलोडीगच्या कामासाठी आलेले होते.
रिगर कामगार सुमित व क्रेन चालक आरोपी हे कंपनीच्या बाहेरील आवारात जॉब लोडिंग अनलोडींगचे काम करु लागले. त्यावेळी इंडो पावर क्रेनवर लावलेला जॉब हा चालक आरोपी क्रेनच्या साहयाने दुसऱ्या ठिकाणी घेवुन जात असताना त्याने सदरची क्रेन हयगयीने चालविली. त्या क्रेनला लावलेला जॉब क्रेनमधुन निघुन जावुन त्या क्रेनची मोठी साखळी व हुक हा त्या ठिकाणी काम करत असलेला कामगार सुमित याच्या डोक्याला लागुन दुखापत झाली.
त्याला उपचारकामी जयहिंद हॉस्पीटल, त्यानंतर पुढील उपचारकामी अॅकॉर्ड हॉस्पीटल, भोसरी या ठिकाणी अॅडमिट करण्यात आले होते. तीथे त्याच्यावर उपचार चालु असताना तो (दि. ६) रोजी सायं. ५.०५ वाजता मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सदरचा अपघात हा चालक कुमार यादव याच्या निष्काळजीपणामुळे हयगयीने झाला असून सुमित मौर्य यास दुखापत होवुन तो मयत झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी सुरज देवराम पानसरे यांनी आरोपी गुडदुकुमार यादव याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी ५५३ /२०२३ भा.द.वि. कलम २७९,३०४ (अ) नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गायकवाड पुढील तपास करीत आहेत.