न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- खेड तालुक्यातील वडगाव घेनंद, गव्हाणे वस्ती येथील वडगाव घाटात (दि. ५) रोजी रात्री ९:३० च्या दरम्यान आरोपी (मयत) सुमित भास्कर धायगुडे (वय २३ वर्षे, रा. मोरे वस्ती, चिखली) याने त्याच्या मालकीची व ताब्यातील गाडी (एमएच१४सीएक्स९३५०) ही बेदरकारपणे, हयगयीने, निष्काळजीपणे चालवली.
अपघातात स्वतःच्या मृत्युस कारणीभूत ठरला. तसेच सह प्रवासी यांना दुखापत व इतर तीघांना किरकोळ दुखापत होण्यास कारणीभूत झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
आळंदी पोलीस ठाण्यात २४१/२०२३ भा.दं.वि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८ नुसार पोलिसांनी मयत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. मपोउपनि कामथे पुढील तपास करीत आहेत.