- मा. स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी महापालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- चिखली गायराणातील गावजत्रा मैदान परिसरातील बैलगाडा घाट व कुस्ती संकुल आणि कबड्डी मैदान तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी मा. स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चिखली गावाला बैलगाडा शर्यत व कुस्ती क्षेत्राची पंरपरा लाभलेले गाव आहे. येथील अनेक मल्लांनी राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली असून आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे नाव महाराष्ट्र स्तरावर उंचावलेले आहे. तसेच कबड्ड सारख्या मैदानी खेळात अनेक खेळाडू चिखली गावात घडले आहेत.
अनेक खेळाडूंनी राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे रुढी परंपरा जोपासण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी समस्त ग्रामस्थांची आहे. यावर लवकरात लवकरात योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असे या निवेदनात दिनेश यादव यांनी म्हटले आहे.

















