- पोलिसांना न कळवता भावाच्या प्रेताची विल्हेवाटही लावली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२३) :- दोघे भाऊ दारु पिवुन हॉटेलमध्ये जेवन करुन दुचाकीवरून येत होते. आरोपी हा दुचाकी चालवित होता. तर, अपघातात मयत झालेला आरोपीचा भाऊ हा त्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसला होता. ते दोघेजन हॉटेलपासुन काही अंतरावरील कच्च्या रस्त्याने जात होता. दरम्यान आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने, निष्काळजीपणे, वेगात चालविल्याने पाठीमागे बसलेला त्याचा भाऊ (मयत) हा रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होवुन तो बेशुध्द झाला. जखमी भावावर देहु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, येलवाडी येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेवुन जात असतानाच त्याचा मृत्यु झाला. त्याचा मयताचा भाऊ त्यास कारणीभूत झाला. या घटनेबाबत पोलीस यंत्रणेस काहीएक माहिती न देता आरोपी भावाने प्रेताची विल्हेवाट लावली असल्याचे एम.एल.सी. च्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि ०२/०४/२०२३) रोजी रात्री ९:३० वाजता येलवाडी, ता-खेड, जि-पुणे गावच्या हद्दीत हॉटेल आमराईकडुन गाडे यांच्या बिल्डींग जवळुन जाणाऱ्या रोडवर घडला.
महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी ५५८ / २०२३ भा.द.वि. कलम २७९, ३३८, ३०४ (अ) मो.वा.का. कलम १३४ (ब) नुसार मारुती सुधाकर निंबाळकर या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि भंडारवाड हे पुढील तपास करीत आहेत.