न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२३) :- पायी फुटपाथच्या कडेने जात असताना एका अज्ञात दुचाकी चालकाने त्याची दुचाकी रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन हयगयीने व अविचाराने भरधाव वेगात चालवली. फिर्यादीस पाठीमागुन धडक देवुन डाव्या पायाच्या नडगीस फॅक्चर करून त्यांना गंभीर जखमी करण्यास आरोपी कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा अपघात (दि. १३) रोजी ५.०० च्या सुमारास विठाई कॉलनी बोर्डाजवळ, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे घडला. फिर्यादी सुनिल संजय भंडारी यांनी अज्ञात दुचाकी चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलीस ठाण्यात ४५१/२०२३ भा.द.वि. कलम २७९, ३३८, मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७, १८४ अन्वये आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोहवा वाव्हळ तपास करीत आहेत.