न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२३) :- अज्ञात इसमांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादीला आयसीआयसीआय बँकेतून (१,२३, ७६७ रूपये) ट्राक्झेक्शन कन्फर्मेशन संबंधित कॉल केला. १,२३,७६७ amount has been transferred from your account if you have done this transaction press 1 if not then press ९ असे फिर्यादी यांना फसवणुक करण्याचे उद्देशाने करावयास लावले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी press ९ करून कन्फरमेशन दिले असता फिर्यादी यांच्या खात्यावरून एकुण २ लाख २३ हजार ७६८ रुपये PAYU PAYMENTS BANK ४१८४०५०००३९४ या अकाऊंट वर गेले आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ०८/०८/२०२३) तानाजीनगर, चिंचवडगाव येथे घडली. महीला फिर्यादीने आरोपी PAYU PAYMENTS BANK ४१८४०५०००३९४ या अकाऊंट धारकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी ४५२/२०२३ भा.दं. वि. कलम ४१९, ४२०, माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी), ६६ (डी) नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वपोनि खराडे पुढील तपास करीत आहेत.