न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- शेजारी-शेजारी फिर्यादी व आरोपी हे राहतात. यातील फिर्यादीला कपडे वाळत घातल्याच्या कारणावरुन आरोपींनी संगनमत करुन शिवीगाळ व हाताने मारहाण केली. त्यातील आरोपी क्र. २ याने फिर्यादी व त्यांचा मुलगा यांच्या डोक्यात लोखंडी पट्टी मारुन त्यांना जखमी केले. आरोपी क्र. १ व आरोपी क्र.५ यांनी फिर्यादी यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १५) रोजी दुपारी १२:०० वाजता गुळवेवस्ती, पांडुरंग इन्डस्ट्रिज, भोसरी येथे फिर्यादीच्या घरासमोर घडली. फिर्यादी खडकसिंग जफटसिंग ठाकुर यांनी आरोपी १) महीला, २) दिपक शिंदे, ३) अनिकेत शिंदे, ४) सुरज पाटोळे, ५) महिला यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ७४४/२०२३ भादवी कलम ३२४,१४१, १४३, १४७, १४९ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोहवा गोगावले पुढील तपास करीत आहेत.










![[भोसरी]:- कपडे वाळत घातल्याच्या कारणावरुन पाच जणांकडून बाप-लेकाला मारहाण...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/650x_2018082819125998-90x60.jpg)
![[भोसरी]:- कपडे वाळत घातल्याच्या कारणावरुन पाच जणांकडून बाप-लेकाला मारहाण...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-1-8-90x60.jpeg)



