न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी फेज २ येथील भांबोली गावात असलेल्या फिर्यादीच्या कंपनीच्या शेडचे शटर उटकटुन आरोपी अज्ञात चोरट्याने (दि.०५ ते दि. १४) रोजी दुपारी ४.०० च्या दरम्यान कंपनीत प्रवेश केला.
चोरट्याने १०७९ किलो वजनाचे १०,७९,००० रुपये किंमतीचे वेगवेगळ्या साईजचे कॉपर बार चोरी करुन नेले आहेत. याप्रकरणी फिर्यादी संतोष वसंत पाटील यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ५६०/२०२३ भा.द.वि.स. कलम ३८०, ४६१ नुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोउपनि जाधव हे पुढील तपास करीत आहेत.