न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- दुचाकीवरून फिर्यादीचे चुलते कामाला जात होते. त्यावेळी कोणत्यातरी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन निष्काळजीपणे, हयगईने, बेदरकारपणे चालवले. फिर्यादीच्या चुलत्यांच्या दुचाकीला पाठीमागुन धडक देऊन त्यांचा अपघात केला. अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत करून त्यांच्या मृत्युस तसेच दुचाकीच्या नुकसानीस आरोपी कारणीभुत होऊन अपघाताची खबर न देता निघुन गेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
गोरख दत्तु आल्हाट (वय ५८ वर्षे) असे अपघातात मृत्यू झालेल्या फिर्यादीच्या चुलत्याचे नाव आहे. हा अपघात (दि. १४) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास मोशी-कचरा डेपोकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आदर्शनगर, मोशी येथे घडला.
फिर्यादी विशाल गुलाब आल्हाट यांनी आरोपी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ४०९/२०२३ भादवि कलम २७९, ३०४(अ) सह मो वा कायदा कलम १८४, ११९/१७७, १३२ (१) (क) प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जाधव तपास करीत आहेत.