न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- ऑनलाईन ७/१२ उतारा काढण्यासाठी फिर्यादी हे सायबर कॅफे येथे गेले होते. त्यावेळी फिर्यादीला आरोपी यांनी फिर्यादीकडून खरेदीखत केलेली जमिन गट न. ५९९ मधील एकूण २५ गुंठे शेत जमिन एका व्यक्तीला दिल्याचे दिसले.
आरोपींने फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीच्या मालकीची जमिन गट न. ५९९ मधील एकूण २५ गुंठे शेत जमिनचे खरेदीखत केले होते. फिर्यादी यांनी आरोपी यांना एकूण ११,००,००० रुपयांच्या घेतलेल्या व्याजाच्या पैशांचे एकूण ११,३०,००० रूपये व्याज दिले होते. परंतू त्यानंतरसुध्दा आरोपीने आणखीन ११ लाख रूपये मुद्दल व ९ लाख रूपये व्याज असे एकूण २० लाख रूपये दिल्याशिवाय जमिन परत फिर्यादीच्या नावावर करून देणार नाही, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करुन त्यांच्या घरातून हाकलून देत अपमानित केले होते. सदरची जमिन फिर्यादी यांच्या परस्पर आरोपीने इसमाला विक्री केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.०३/०३/२०१८ ते दि. ०७/०७/२०२३ पर्यंत) जमिन गट न. ५९९, कोयाळी, आळंदी, ता. खेड जि. पुणे येथे घडला. फिर्यादी सुदाम नारायण भाडळे यांनी आरोपी मोहन गणपत गंगावणे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी २४५ / २०२३ भा द वि ४०६, ५०४, ५०६ महा. सावकारी अधि. सन २०१४ चे कलम ३९,४५ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोफो टोके तपास करीत आहेत.









![[आळंदी]:- ऑनलाईन ७/१२ उतारा काढायला गेले अनं सावकाराचा प्रताप उघड झाला...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-2-10-90x60.jpeg)
![[आळंदी]:- ऑनलाईन ७/१२ उतारा काढायला गेले अनं सावकाराचा प्रताप उघड झाला...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-4-6-90x60.jpeg)




