न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२३) :- टेकरीचेस प्रा. लि. कंपनीद्वारे ई लर्निंग कन्टेंड डेव्हलपमेंट सर्विस आणि कि बोर्ड तसेच संबधीत पुस्तके वितरण करण्याचा आरोपीचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांना आरोपीने ‘माझ्या व्यवसायात गुंतवणुक करा, मी तुम्हाला चांगला प्रॉफीट करुन देतो’ असे सांगुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
एकुण ५४,१०,००० रुपयाची गुंतवणुक करण्यास भाग पाडले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी गुंतवणुक केलेले पैसे व त्यावरील प्रॉफीट न देता त्यांचा विश्वास संपादन करून फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि २५/०५/२०२१ ते आजपावेतो) भुमकर चौक, वाकड येथे घडला.
फिर्यादी मंगेश शामसुंदर दळवी यांनी आरोपी अमित शामराव माने व त्याचे इतर साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात ११०० / २०२३ भादवि कलम ४०६, ४२० अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गाढवे पुढील तपास करीत आहेत.