न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२३) :- १९ वर्षीय तरूण हा त्याच्या अॅक्टीवा दुचाकीवरून जात असताना त्याची गाडी स्लीप झाली. त्यावेळी अज्ञात कंन्टेनर ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील कंन्टेनर ट्रक बेदरकारपणे जोरात चालवुन वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करुन दुचाकी गाडी चालकाला धडक देऊन त्याचा अपघात केला. अपघातामध्ये वाहनाचे नुकसान केले. तसेच ट्रकचे चाक तरुणाच्या डोक्यावरुन गेल्याने डोक्यास गंभीर दुखापत होऊन अपघातात तरुणाचा मृत्यू झाला.
आरोपी वाहनचालक तरुणाच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि ९) रोजी सकाळी ०७:०० वा. चे सुमारास अलंकापुरम रोड, भारत पेट्रोल पंपाजवळ, वडमुखवाडी येथे घडली.
दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात कंन्टेनर ट्रक चालकाच्या विरोधात ४४८ / २०२३ भा. द. वि. कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मो.वा.का. क. १८४, १३७/१७७, ४२७ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि किर्वे पुढील तपास करीत आहेत.