न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२३) :- चाकण येथील मार्केट रोडवरील फिर्यादीच्या बिग बझार मॉलमध्ये आरोपी आला. फिर्यादीचा कामगार फारीश याला धक्का देत ‘हा मॉल तुम्ही कसा काय चालु केला, हा मॉल बंद करा, मॉल चालवायाचा असेल तर मला एक हजार रुपये हप्ता दयावा लागेल’, असे म्हणून चाकुने मारण्याची धमकी दिली. पैसे देण्यास नकार दिल्यास मॉल पेट्रोल टाकुन जाळुन टाकण्याची धमकी दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ४) रोजी सायं. ६.४५ च्या सुमारास चाकण येथील मार्केट रोडवरील बिग बझार मॉलमध्ये घडला. फिर्यादी यासीन युनुस मोहंमद (वय २७ वर्षे, धंदा- बिग बजार व्यवसाय, रा. चाकण) याने आरोपी आकाश चंद्रकांत घोडके (वय २३ वर्षे, रा. जयभारत चौक, चाकण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी ७८० / २०२३ भादवि का क ३८५, ३८७, ३२३, ५०६ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. पोउपनि सुकाळे पुढील तपास करीत आहेत.













