- परप्रांतीय तरुणाचा अपघातात मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२३) :- मुंबईकडे जाणारा महामार्ग फिर्यादीसह फिर्यादीचा मित्र क्रॉस करत होते. फिर्यादीने रोड क्रॉस केला. पण फिर्यादीच्या मित्राला रस्ता क्रॉस करीत असताना अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने धडक दिली. अपघातात जबर जखमी करून त्याच्या मृत्यूस आरोपी वाहनचालक कारणीभूत झाला आहे.
भोलाराम बेल तन्ती (वय ३३ वर्षे, रा. महिंद्रा कंपनी लेबर कॅम्प, ताथवडे; मुळ रा. मु. कचरी गाव, जि. सिलीतपुरा, राज्य आसाम) असे मयताचे नाव आहे. हा प्रकार दि. ३) रोजी दुपारी ३.०० वाजता सागर वाईन दुकाणासमोर, पुणे-मुंबई कडे जाणा-या हायवे रोड वाहीनीवर, पुनावळे येथे घडला.
फिर्यादी बिकी उदय करमोकार (वय २३, धंदा बिगारी, रा सध्या महिंद्रा कंपनी लेबर कॅम्प ताथवडे, ता मुळशी) याने आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलीस ठाण्यात ३४८ / २०२३ भा.दं.वि.स. कलम २७९, ३०४(अ) सह मो.वा.का. कलम १८४१३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.













