न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२३) :- ‘मी फयुचर ग्रुपचे व क्रेडीट कार्डचे काम करीत असतो, तुमचे काही काम करायचे असेल तर सांगा,’ असे आरोपीने फिर्यादीला सांगितले होते. दरम्यान फिर्यादीने त्यांच्या बजाज फयनान्स आर. बी. एल क्रेडीट कार्डचा प्रॉब्लेम झाला आहे, पैसे भरुन देखील जास्त बिल दाखवत आहे, असे सांगितले होते. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादीचे क्रेडीट कार्ड स्वत:कडे घेतले.
फिर्यादी यांच्या बजाज फायनान्स आर. बी. एल. क्रेडीट कार्डवरुन २१,२४७ रुपये ट्रान्सफर केले. फिर्यादी यांच्या नावे फ्लीपकार्डवरुन बजाज फायनान्सचे ऑनलाईन लोन करुन ९५,१६३ रु. किं. चा टि.व्ही. खरेदी केला. तसेच रिलायन्स डिजीटल, मुंबई-पुणे हायवे, चिंचवड याठिकाणी फिर्यादी यांच्या नावे एच.डी.एफ.सी. बँकेचे लोन करुन १,०७,८९९ रु. किं. चा आय फोन १४ प्लस मोबाईल खरेदी केला.
फिर्यादी यांच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेवुन फिर्यादीची एकुण २,२४,३०९ रुपयांची अर्थिक फसवणुक केली. हा प्रकार (दि.१०/०४/२०२३ ते दिनांक ३०/०४/२०२३) दरम्यान ज्योतिबा गार्डन जवळ, पवना नगर, काळेवाडी येथे घडला. फिर्यादी मधुकर गोविंद पाटील (वय ४२ वर्षे, तापकीर नगर, काळेवाडी) यांनी आरोपी आकाश विष्णु पाडाळे (रा. गाली, केवल्यधाम, लोणावळा) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ९६१ / २०२३ भा.द.वि. कलम ४०६, ४२० प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एम. के. मणेर, पोलीस उप निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.













