न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२३) :- विरोधात एन.सी. दिल्याचा राग मनात धरून आरोपी यांनी अष्टविनायक सोसायटी, येथे हेतुपूर्वक कृत्य केले. आरोपींनी हातामध्ये कोयते, प्लेवर ब्लॉक, दगड, विठा, काठी बाळगली. फिर्यादीच्या तसेच फिर्यादीच्या गल्लीतील इसमांच्या गाडयांचे खोडशाळपणे नुकसान केले. शिवीगाळी करून, हातात कोयता घेवुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन, परीसरात दहशत निर्माण केली.
ही घटना (दि.०३) रोजी रात्री ९.४५ वाजता अष्टविनायक सोसायटी, गजानन महाराज नगर, स्वराज कॉलणी दिघी येथे घडली. फिर्यादी मनोज श्रीरंग कदम (वय ३१ वर्षे, गजानन महाराज नगर, स्वराज कॉलणी, दिघी) यांनी आरोपी १.विशाल वारे,२.आकाश सोनावणे, ३. राम मोहन देवकाते (वय २० वर्षे रा. महादेवनगर, चक्रपाणी, भोसरी), ४. ओंमकार विनोद लोयरे (वय २० वर्षे रा. लांडेवाडी विठठल नगर, भोसरी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
दिघी पोली ठाण्यात ४६९/२०२३ भादवी कलम ४२७, ५०६ (२), ३४, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंड अॅक्ट. कलम ०७ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ३ व ४ अटक आहेत. पोउपनि कटपाळे पुढील तपास करीत आहेत.
—













