- शिवशाही व्यापारीसंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने नविन ”हॅशटॅग” ची घोषना
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल) :- शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या निवड नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. सध्या लोकसभा निवडणुकांचे सत्र सुरु आहे.
शिवशाही व्यापारीसंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी तंत्रज्ञानाच्या जगात अपडेट राहण्यासाठी, अनोखी संकल्पना राबवत संघटनेसाठी नवीन ‘हॅशटॅग’ ची घोषणा केलेली आहे. ”थांबलक्ष्मीकुंकूलावतेआपल्याशिवसेनेलाम्हणजेचमहायुतीलामतदेऊन येते” हे या हॅशटॅगचे नाव आहे.
कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या म्हणजेच महायुतीच्या महाराष्ट्रातील उमेदवारांना प्रचंड प्रमाणात मतदान मिळवुन देण्यासाठी या ”हॅशटॅग” चा प्रचार करावा, असे आवाहन प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, शिवशाही व्यापारीसंघ महिला आघाडी प्रदेश कार्याध्यक्षा सुनिता खंडाळकर व शिवशाही व्यापारी संघाच्या जिल्हाध्याक्षांना कटिबद्द राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.










