न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल) :- शिक्षणमहर्षी कै. शिवाजीराव कोंडे स्मृति राज्यस्तरीय बुद्धिबळ चॅंपियनशिप स्पर्धेत आरुष बबन डोळस याने दुसरा क्रमांक पटकावला. आरुषची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सांगवी येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. बबन डोळस यांचा तो चिरंजीव आहे.
७ वर्षाखालील झालेल्या स्पर्धेत विजेत्या आरुषला स्मृतिचिन्ह व रोख रक्कम साडेतीन हजार रुपये, असे पारितोषिक देण्यात आले. शिवभुमी शाळेचे राजेंद्र कोंडे यांच्या हस्ते आरुषला बक्षीस देण्यात आले. कोलकाता येथे जूनमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आरुष हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ आहे.










