न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. १० एप्रिल) :- थेरगाव येथील पीसीएमसीज वेरोक वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने शनिवार (दि. १३ व १४ एप्रिल) रोजी क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
निवड चाचणीसाठी इच्छुक खेळाडूंचा वयोगट ९ ते १९ वर्षे आहे. निवड चाचणीस येताना खेळाडूंनी क्रिकेट गणवेश व क्रिकेट कीट व साहित्यासह सकाळी ९ वाजता मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.










