न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२३) :- पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर उद्या गुरुवारी (दि. १२) रोजी पुन्हा एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने उर्से टोलनाका येथे थांबविण्यात येणार आहे.
अवजड वाहतूक वगळता इतर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलं आहे. मंगळवारी देखील ओव्हर हेड ग्रॅंटी उभारण्यात आली होती. तेव्हा, दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.