न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त नर्मदा खोऱ्यातील आदिवासी बांधवांसाठी कपडे दान उपक्रम राबविण्यात आला.
तीर्थक्षेत्र आळंदी येथून दरवर्षी नर्मदा खोऱ्यातील आदिवासी बांधवासाठी कपडे व घरगुती व शैक्षणिक साहित्य पाठविले जाते. लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड यांच्या वतीने समाजबांधवाकडून वापरण्यायोग्य कपड्यांचे संकलन केले जाते.
या उपक्रमात लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. ला. शंकर गायकवाड, सचिव ला. प्रशांत शर्मा, खजिनादर ला. संदीप वाळुंज, माजी अध्यक्षा ला. जयश्री साठे, ला. दिपाली कुलकर्णी, ला. अरुण इंगळे, ला. मुकुंद आवटे, ला. तृप्ती शर्मा, ला. संगीता इंगळे, ला. किरण आवटे, ला. शंकर देवरे, ला. दिगंबर ढोकले, ला. डॉ प्रशांत गदिया, ला. विठ्ठल खेसे तसेच अथर्व कुलकर्णी व इंद्रायणी वोकेशनल कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या समाजकार्यात भोसरीतील डॉ. अनिल खाडे व आळंदीतील डॉ. ज्योती माटेयांनी तसेच क्लबमधील सर्व सदस्यांनी कपडे दान केले. आठ गोणी कपड्यांचे दान करण्यात आले. सर्व सहभागी सदस्यांचे अध्यक्ष ला. डॉ शंकर गायकवाड यांनी आभार मानले.













