न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२३) :- गृह विभागाने राज्यातील १०४ पोलिस निरीक्षकांना पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त पदावर बढती दिली आहे. यामध्ये पिंपरी- चिंचवड शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, विवेक मुगळीकर, रवींद्र जाधव, रंगनाथ उंडे, सत्यवान माने, दीपक ज्ञानोबा शिंदे यांचा समावेश आहे.
हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना सहायक पोलिस आयुक्तपदी बढती मिळाली असून त्यांची पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातीलच विभागामध्ये नियुक्ती असणार आहे.
भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव आणि तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांची पोलिस उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बढती देण्यात आली आहे.
निगडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उड़े यांना पुणे शहर पोलिस दलात सहायक पोलिस आयुक्त पदावर बढती मिळाली आहे. दीपक ज्ञानोबा शिंदे यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बढ़ती झाली आहे. याबाबतचे आदेश पोलिस प्रशासनाने काढले आहेत.













