न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागांतर्गत येणारी पिंपरीतील भाटनगर येथील लिंक रोडवरील विद्युत दाहीनी बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. याची दखल घेत, नगरसेवक शैलेश मोरे यांनी विद्युत दाहिनी दुरुस्ती संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. त्यास यश आले आहे.
महापालिकेने नगरसेवक मोरे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत, विद्युत दाहिनी दुरुस्ती कामासाठी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यासंदर्भात अ क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी महापालिकेचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना विद्युत दाहीनी दुरुस्त झाल्याबाबतचे पत्र पाठविले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, मनपाची भाटनगर येथील लिंक रोडवरील विद्युत दाहीनी येथील हिटींग कॉईल बदलणे तसेच मुख्य भट्टीमधील वेगवेगळ्या प्रकारच्या विटा बदलणे, विद्युत पॅनल व कॉईलचा विजपुरवठा सुरळीत करणे व भट्टीच्या आतील बाजूने भिंतीची डागडुजी करणे इ. दुरुस्ती कामाकरीता (दि. १८ मार्च ते ०६ एप्रिल) पर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
सदरचे दुरूस्ती कामांनंतर (दि. ७ एप्रिल) रोजी विद्युत दाहीनी कार्यान्वित करणेत आलेली आहे. तथापी भट्टीचे आवश्यक तापमान येउन मंगळवार (दि. ९) रोजी सायंकाळपासुन प्रेताचे दहन करणेस तयार झालेली आहे, असे या पत्रात म्हटले आहे.










