न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२३) :- कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावी सायन्स मधील कु.सिद्धी शिर्के हिने तिरुवंतपुरम येथे झालेल्या मास स्टार्ट इव्हेंट’ मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत पहिला क्रमांक पटकावला.
तसेच ‘एम.टी. बी. एशियन सायकलिंग चॅम्पियनशीप’ साठी ती भारताचे नेतृत्त्व करणार आहे. यासाठी महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षकांनी तिला मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातून संस्थेचे सचिव दीपक शहा, उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे,क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापिका शबाना शेख ,क्रीडा शिक्षक प्राध्यापक अक्षय परदेशी,सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सिद्धीचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.