न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील झेंडेमळा येथील शेतकऱ्यांना लष्कराकडून होणाऱ्या त्रासाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून मंडल अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत शेतकरी पांडुरंग झेंडे, सचिन झेंडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, परिसरातील शेतकऱ्यांना २०१३ पासून स्थानिक लष्करातील अधिकारी घरे बांधण्यास, रस्ता दुरुस्त करण्यास आणि शेती करण्यास अडथळे निर्माण करतात. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सर्व शेतकऱ्यांनी कागदपत्रे उपलब्ध करून केंद्र सरकार व राज्य सरकारला पत्रव्यवहार केला.
त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मंडल अधिकारी (पिंपरी-चिंचवड) यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. मंडल अधिकाऱ्यांनी पांडुरंग झेंडे यांना सुनावणीसाठी नोटीस पाठवली. यानंतर त्या नोटिशीला उत्तर दिले व शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.















