न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल) :- आकुर्डीस्थित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी महाविदयालयाच्या चतुर्थ वर्षाच्या विदयार्थ्यांनी “मॅप्रो फूड्स पार्क” सातारा या औदयोगिक उदयोगाला भेट दिली. अभ्यासक्रमातील समाविष्ठ पाठयांच्या आधारे निवडलेल्या, अशा उदयोगांच्या भेटीमुळे विदयार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर होते. त्याचवेळी औदयोगिक संस्कृती बद्दल विदयार्थ्यांना वेळीच ज्ञान मिळाल्यामुळे त्यांचा गुणात्मक विकास अधिक योग्य प्रकारे होतो. याभेटी दरम्यान विदयार्थ्याना कोल्ड स्टोरेज रूम मधील चॉकलेट पान, फळ चॉकलेट, विविध सिरपस, चॉकलेट कोटिंग, जाम व जेली, रिक्त बाटली मेल्डिंग इत्यादीची प्रक्रिया आणि जंतुमुक्त वातावरण निमिर्तीसाठी वापरात येणारी ए एच यू (अञ्ू) संकल्पना समजून देण्यात आली.
“मॅप्रो फूड्स पार्क” सातारा या औद्योगिक उद्योगाचे वरिष्ठ अधिकारी श्री. प्रणित जिभकाटे यांनी प्रत्येक उत्पादनासाठीचे एफ. एस. एस. आय. नियम, खाण्याचे रंगीत द्रव्याचा वापर त्याचे उत्पादनांमध्ये वापरले जाण्याचे प्रमाण, विविध उत्पादनांचे परिक्षण, बी आय एस नियम, स्थिरता संकल्पना, मायक्रोबीयल लोड, विक्रेता निवड आणि लेखापरिक्षण, क्यु ए ची भूमिका व महत्व तसेच एसओपी संकल्पना व ऑरगेनोलेप्टीक चाचणी इत्यादीचे सविस्तर मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रशिक्षण नियोजन अधिकारी प्रा. शुभांगी जाधव यांनी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांच्या मार्गदर्शना खाली केले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. डॉ.सुधीर पांडया, प्रा. डॉ. सोनाली महापरळे, प्रा. डॉ. शुभांगी दसवडकर, प्रा. मुकेश मोहिते, शिक्षकेतर कर्मचारी अभिनव सांळुखे व प्रभाकर यादव, विदयार्थी राजु माने, स्वागत टकले व रूपाली बिरादार यांनी अथक परिश्रम घेतले.










