न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड शहरात रात्री-अपरात्री वाहनांवर होणारी दगडफेक व वाहनांचे नुकसान काही केल्या थांबायलाच तयार नाही. काळेवाडीतील राहटणी-श्रीनगर परिसरातही बुधवार (दि. १०) रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी शिवसेना पदाधिकाऱ्याच्या वाहनावर दगडफेक करून, वाहनाचे मोठे नुकसान केले आहे.
शिवसेनेचे प्रदीप दळवी हे शिवसेनेच्या राहटणी-श्रीनगर विभागाचे विभागप्रमुख आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ”माझ्या गाडीशेजारी इतर गाड्या असतानाही, केवळ माझ्याच गाडीला लक्ष करण्यात आले आहे. हे राजकीय कृत्य असून, वैयक्तिक सुडापोटी राजकीय व्यक्तींनी माझ्या वाहनाला लक्ष केले आहे”.
या घटनेची माहीती मिळताच शिवसेनेचे विभाग संघटक अंकुश कोळेकर व शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ वाकड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिष माने यांना या घटनेची माहिती दिली.
शिवसेना पक्षाचे विभागप्रमुख प्रदिप दळवी हे संघटनेची आक्रमकपणे मांडणी करीत आहेत. याचाच राग मनात ठेवुन, राञी अन्यात व्यक्तीने शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी यांची गाडी फोडली आहे. या घटनेचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करीत आहोत. शिवसैनिकांच्या गाड्या फोडून, निवडणुका जिंकता येत नसतात. शिवसैनिक भ्याड हल्यांना भिक घालत नाही. तात्काळ आरोपी जेरबंद करण्याची मागणी यावेळी दाखले यांनी पोलिसांकडे केली.










