न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२३) :- विजयादशमी निमित्त नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक,ने क्सा शोरूम समोर मंगळवारी (दि. २४) रोजी सायं.६ वाजता पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील सर्वात मोठ्या रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी यंदा १२० फूट उंचीचा रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यात येणार आहे. रावणाच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सोमवारी दुपारपर्यंत पुतळा उभारण्यात येणार आहे. बांबू, काठ्या, सुतळी, पुठ्ठे, काथ्या, खिळे, दोरी आदी साहित्यांचा वापर करून रावणाची प्रतिकृती तयार केली जात आहे.
संध्याकाळचे मुख्य आकर्षण दुसरे तिसरे कोणी नसून सुनील अनिल तिलकधारी, हिसार हे या उत्सवाचा भाग होण्यासाठी हरियाणातून प्रवास करून येणार आहेत. तसेच या कार्यक्रमात टाईम पास -३ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे, तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि प्रसिद्धी दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे या प्रमुख पाहुण्यांचा समावेश असेल. चेतन अग्रवाल, नीतू अग्रवाल आणि आरजे अक्षय या कार्यक्रमाचे अँकरिंग करणार आहेत.
रावण दहनानेच रामराज्य आलं. हे हिंदुस्थानाला माहित आहे. सबंध महाराष्ट्रात रावण दहन होत असते. रूढी परंपरा असल्यामुळे कुणाच्याही भावना दुखवण्याचा प्रश्नच नाही. दुष्ट विचारांवर मात व्हावी आणि आपली संस्कृती टिकवावी, या हेतून पिंपरी चिंचवड, पुणे शहरामधील सर्वात मोठ्या रावण दहन कार्यक्रमासाठी पिंपळे सौदागर सज्ज झाले आहे.
– मा. शत्रुघ्न काटे – आयोजक तथा मा. नगरसेवक, पिं. चिं. मनपा…














